
वय वर्षे ७ ते १४ या वयोगटातील मुलामुलींचा अतिशय वेगाने होणारा शारीरिक, मानसिक आणि बौद्धिक विकास लक्षात घेता त्यांच्यासाठी “ संस्कार वर्गात काही विशिष्ट प्रकारचे उपक्रम
पालकांनो,
वय वर्षे ७ ते १४
या वयोगटातील मुलामुलींचा अतिशय वेगाने होणारा शारीरिक, मानसिक आणि बौद्धिक विकास
लक्षात घेता त्यांच्यासाठी “दादर संस्कार वर्गा”त काही विशिष्ट
प्रकारचे उपक्रम राबवण्यावर भर दिला जातो.
या वयातील मुलामुलींच्या भावविश्वाचा विचार केला असता अनेक
मुलामुलींना आपल्या सभोवताली घडणाऱ्या नवनवीन गोष्टी जाणून घेण्याची प्रचंड उत्सुकता आणि आपल्या भावना
मुक्तपणे व्यक्त करण्याची इच्छा असते. तसेच याच वयात
पालकांनादेखील आपल्या पाल्यातील सुप्त गुण ओळखून भविष्यात
त्याचा किंवा तिचा कोणत्या विषयाकडे
जास्त कल आहे हे
ओळखण्यात मदतच होते. आणि
म्हणूनच या वयोगटातील मुलामुलींना
शालेय शिक्षणाबरोबरच त्यांची अभ्यासेतर उपक्रमांमधील आवड ओळखून आमच्या
वर्गातील तज्ज्ञ व्यक्तींकडून योग्य तो सल्ला देण्यात
येतो. त्याचबरोबर आपल्या संस्कृतीची अधिकाधिक ओळख होण्यासाठी नियमितपणे
वर्गात सण व उत्सव
साजरे करणे, योगशिबिरे घेणे, श्लोक स्पर्धा, गायन व नृत्य
स्पर्धा, वक्तृत्व स्पर्धा, चित्रकला आणि हस्तकला स्पर्धा
अशा विविध स्पर्धांच्या माध्यमातून त्यांच्यातील कलागुणांना वाव देणे, तसेच
मुलामुलींच्या बुद्ध्यांक आणि भावनांक वाढीसाठी
प्रयत्न करणे, उत्तम आरोग्य, सकस आहार आणि
निकोप जीवनशैलीची माहिती करून देणे यासारख्या
विविध उपक्रमांचे आयोजन दादर संस्कार वर्गामार्फत
वेळोवेळी करण्यात येते.